Breaking

बुधवार, ८ जानेवारी, २०२५

*शरदचंद्रजी पवार काळाच्या पुढे पाहणारे नेते : प्रा. किशोर सुतार यांचे प्रतिपादन*

 

व्याख्यानमालेत मार्गदर्शन करताना प्रा. किशोर सुतार, सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, डॉ. प्रकाश टोणे व अन्य मान्यवर 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


सातारा : शरद पवार यांच्या कार्याचे मूल्यमापन त्यांच्या राजकीय यशापयशावर करता येणार नाही. त्यांचे विचार आणि कार्यप्रणाली त्यांच्याकडे असलेल्या काळाच्याही पुढे पाहण्याच्या दृष्टीतून दिसून येते, असे मत वक्ते व अभ्यासक प्रा. किशोर सुतार यांनी व्यक्त केले.

      रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'शरद पवार काळ, कर्तृत्व व विचार' या विषयावरील विशेष व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे होते. 

      यावेळी वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य प्रो. डॉ. सर्जेराव पवार, कला शाखेचे उपप्राचार्य प्रो. डॉ. गजानन भोसले, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक डॉ. जयश्री आफळे, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. प्रकाश टोणे आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा