Breaking

बुधवार, ८ जानेवारी, २०२५

*बदलत्या जीवनशैलीसाठी मानसशास्त्रीय उपाययोजना हाच जालीम उपाय : प्रा.डॉ. भरत नाईक यांचे प्रतिपादन*

 

कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा.डॉ. भरत नाईक, प्राचार्य डॉ. विकास मिणचेकर, समन्वयक प्रा.डॉ. विजय माला चौगुले व अन्य मान्यवर प्राध्यापक


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : शिवाजी विद्यापीठ मानसशास्त्र परिषद,श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय जयसिंगपूर आणि जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी 'क्षेत्र प्रयोग' या विषयावर कार्यशाळा कन्या महाविद्यालयाची संपन्न झाली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विकास 

    कार्यशाळेचे उद्घाटक व बीजभाषक डॉ. भरत नाईक म्हणाले, जगातील कुठल्याही व्यक्तीच्या जीवनशैली, नातेसंबंध, करिअर निर्णय आणि वैयक्तिक आनंद या सर्व गोष्टींवर मानसशास्त्राचा परिणाम होत असतो. त्यामुळे मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक, आणि तज्ज्ञांची मागणी दिवसेगणिक वाढत आहे.बदलत्या जगात मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि मानसशास्त्राची गरज ही केवळ व्यक्तीगत नाही तर सामाजिक आणि आर्थिक स्तरावरही मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे.त्यामुळे बदलत्या जीवनशैलीसाठी मानसशास्त्रीय उपाययोजना हाच जालीम उपाय व काळाची गरज असल्याबाबतचे मत व्यक्त केले. 

     अध्यक्ष स्थानावर बोलताना प्राचार्य डॉ. विकास मिणचेकर म्हणाले,जागतिक स्तरावर मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढत असल्याने जनजागृती  वाढवण्यासाठी अशा कार्यशाळेची गरज असून नवीन शैक्षणिक धोरण,२०२०  आराखड्यानुसार मानसशास्त्र विषयाची अभ्यास रचना केल्याचे स्पष्ट केले. प्रतिपादन कार्यशाळेमध्ये स्वागत व प्रास्ताविक यांनी केले. या कार्यशाळेसाठी शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सांगली सातारा कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून ३० प्राध्यापक व २०० विद्यार्थी उपस्थित होते. घनश्याम कांबळे, प्रा.डॉ.विनायक होनमोरे, डॉ. तेजपाल जगताप, डॉ. सुरेश संकपाळ,डॉ. विनोद कांबळे व डॉ.राहुल कश्यप यांनी क्षेत्र प्रयोगांविषयी विद्यार्थ्यांना सांगोपांग पद्धतीने मार्गदर्शन केले. जयसिंगपूर कॉलेजचे  प्राचार्य, डॉ.सुरत मांजरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

  कार्यशाळेमध्ये  प्रा.डॉ. विजयमाला चौगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.( समन्वयक, जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर) समारोप सत्रात प्राचार्य प्रा.डॉ. विकास मिणचेकर यांनी आभार व्यक्त केले.या कृतीशील कार्यशाळेबाबत उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा