Breaking

शनिवार, ११ जानेवारी, २०२५

*प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने यांचा वाढदिवस विधायक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा*

 

*संस्थेचे सचिव भैय्यासाहेब माने यांचा वाढदिवस विधायक कामाच्या माध्यमातून संपन्न*


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कागल : येथील डी.आर.माने कॉलेज या संस्थेचे सचिव मा. प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने यांचा ६४वा वाढदिवस विधायक कामाच्या माध्यमातून अर्थात स्वच्छता शिबीराच्या माध्यमातून  साजरा करण्यात आला.

   मा.प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली  NCC व NSS या दोन राष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून कागल शहरातील लिंगायत दफनभूमी, हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम कब्रस्तान येथे स्वच्छता करून  सामाजिक संवेदनशीलता व भैय्यासाहेब माने यांच्या विषयी अटळ श्रद्धा व  निःस्पृह प्रेम दाखवीत हा उपक्रम स्वच्छतेने व मनोभावे  राबविण्यात आला. 

     हा उपक्रम राबवण्यासाठी NCC चे प्रमुख कॅप्टन डॉ. संतोष जेठिथोर, NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. धनाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला. यावेळी प्रा. संदीप वाडीकर, डॉ. लखन भोगम, प्रा. राजेश नढाळे, प्रा. आवटे, प्रा. संग्राम तोडकर व प्रा. पुजा पाटील उपस्थित होते. NCC  कॅडेट व NSS च्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला होता.

      या अनोख्या विधायक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा