![]() |
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. सतीश देसाई, साधन व्यक्ती डॉ. प्रभाकर माने, डॉ. तुकाराम राबाडे, उपप्राचार्य डॉ.कोळेकर, डॉ. सौ.कांबळे,प्रा.मदने व प्रा.सौ.जगताप |
प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक
पांचगणी : दिनांक २ डिसेंबर, 2024 रोजी श्रीमती मीनलबेन महेता कॉलेज पाचगणी येथील अर्थशास्त्र विभाग व जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरचे अर्थशास्त्र विभाग यांचे संयुक्त विद्यमाने 'पर्यटनाचे अर्थशास्त्र' या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सतीश देसाई, डॉ. प्रभाकर माने व उपप्राचार्य डॉ.बाळासाहेब कोकरे उपस्थित होते.
या कार्यशाळेचे समन्वयक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. तुकाराम राबाडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविकामध्ये पर्यटन व करिअरच्या संधी हा कार्यशाळा आयोजनाचा हेतू स्पष्ट केल.
याप्रसंगी प्रथम सत्रात साधन व्यक्ती म्हणून जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूर चे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर माने यांनी "पर्यटन अर्थशास्त्राचे वाढते महत्त्व : आर्थिक विकासात पर्यटनाची भूमिका" याविषयी विद्यार्थ्यांना व्यावहारिक उदाहरणांच्या द्वारे मार्गदर्शन केले.डॉ.माने यांनी मार्गदर्शक व अनुवाद, प्रवास सल्लागार, हॉटेल व्यवस्थापन, इव्हेंट मॅनेजमेंट, विमान व पर्यटन उद्योग, संशोधन व शिक्षण, डिजिटल मार्केटिंग आणि पर्यटन या विभा विभागाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या करिअरच्या संधी कोणत्या आहेत याबाबत अधिक विस्तृत माहिती दिली.
द्वितीय सत्रात साधन व्यक्ती म्हणून प्रा.डॉ. राबाडे यांनी कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पाचगणी व महाबळेश्वर परिसरातील निसर्ग तसेच ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन स्थळांची विस्तृत माहिती दिली. पर्यटन विषयाच्या अनुषंगाने करिअरच्या विविध संधी व पाचगणी - महाबळेश्वर परिसरातील पर्यटन अर्थशास्त्रबाबत सांगोपांग माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. यावेळी त्यांनी पर्यटनाचा अर्थशास्त्र या विषयावर आधारित संशोधनात्मक अभ्यास असलेला एक ठोस व उपयुक्त असा संशोधन पेपर सादर केला.
कॉलेजचे प्राचार्य डॉ. सतीश देसाई यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, पर्यटन हे आधुनिक समाज व्यवस्थेत महत्त्वपूर्ण गरज बनली आहे यातूनच आर्थिक,सामाजिक व कला व सांस्कृतिक विकास होण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन केले. तसेच पर्यटन हे केवळ प्रवास नाही तर स्थानिक आणि जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेला चालना देणारे एक प्रभावी साधन आहे. त्यामुळे त्यात उत्तम करिअर संधी आहेत.
या कार्यक्रमास कॉलेजचे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रियदर्शनी कांबळे व राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. ऋषिकेश इनामदार, शारीरिक शिक्षण संचालक प्रा.माणिक गोरवे ,अन्य प्राध्यापक वृंद महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचे विद्यार्थी, जयसिंगपूर कॉलेज अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. प्रातिनिधिक स्वरूपात दोन विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेबाबत आपले मनोगत व्यक्त केले. दोन्हीही कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेच्या योजनाबाबत समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा. रमेश मदने यांनी केले, प्रा. रोहिणी जगताप यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे उत्तम व नेटके नियोजन अर्थशास्त्र विभाग, इतिहास विभागाच्या प्रा. रेशमा देवरे व अन्य घटकांचे सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा