![]() |
नृसिंहवाडीचा सुपुत्र संभाजी शिवाजी भोसले (गिर्यारोहक) |
*प्रा. चिदानंद अळोळी : उपसंपादक*
नृसिंहवाडी : येथील संभाजी शिवाजी भोसले या तरुणाने गिर्यारोहणामध्ये महाराष्ट्राचे एवरेस्ट समजल्या जाणाऱ्या 280 फूट उंचीचा ' वजीर' सुळका अवघ्या 30 मिनिटांमध्ये सर केला असून त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
ठाणे जिल्हयातील शहापूर विभागात माहुली किल्ला परिसरात असलेला 90° अंश उभा , 280 फूट उंचीचा व समुद्र सपाटीपासून 2 हजार 800 फूट उंचीचा 'वजीर सुळका' गिर्यारोहणात अजस्त्र व चढाईस अतिकठीण मानला जातो. सह्याद्रीचा दुर्गम भाग , उंच टेकड्या , धनदाट जंगल, निसरडी वाट , जोराचा सुटलेला वारा , ढगाळ व दुक्यांनी पसरलेले वातावरण , तापमान 10℃ , जोराची थंडी , पाठीवर ओझे यातून जरासे पाऊल घसरले तर दरीत पडण्याची भीती, दोन्ही बाजूला खोल दरी , सुळक्याच्या पूर्वेकडील दारीचा उतार 600 फूट आहे , पाण्याची प्रचंड कमतरता यामुळे हा गिर्यारोहण करणे अवघड समजले जाते.
नृसिंहवाडी इथील संभाजी शिवाजी भोसले या तरुणाने गिर्यारोहणामध्ये महाराष्ट्राचे एवरेस्ट समजल्या जाणाऱ्या 280 फूट उंचीचा वजीर सुळका सर केला. 90 अंशातील सरळ उभी अति कठीण चढाई करत शारिरीक आणि मानसिकतेचा कस पाहणारी मोहीम गिर्यारोहनावेळी वरून अचानक येणारे दगड - धोंडे , कंबरेचा रोप सांभाळत अवघड टप्यावर शांततेत तर सोप्या टप्यावर वेगाने अशा सर्व आव्हानांना पेलत ही मोहीम संभाजी भोसले ने यशस्वीरित्या पूर्ण केली . या मोहिमेदरम्यान शिवछत्रपती , शंभूराजे व जय श्री राम यांचा अखंड जय घोष करत ही मोहीम पूर्ण केली गेली . ही मोहीम त्याने छत्रपती शिवराय व शंभूराजे यांना समर्पित केली .
या ट्रेकिंग साठी महाराष्ट्र रेंजरस् चे गिर्यारोहक प्रदीप चव्हाण व टीमचे मार्गदर्शन लाभले . प्रत्येक गिर्यारोहनावेळी त्याला सोमनाथ शिंदे सर व अक्षय शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले आहे . तर वडील शिवाजी भोसले , कुटूंबियांचे व मित्र परिवाराचे पाठबळ व साथ मिळाली . ही मोहीम त्याने 22 डिसेंबर 2024 रोजी पूर्ण केली.
वयाच्या 12 व्या वर्षांपासून तो गडकोट मोहिम करत आहे . 2012 पासून संभाजी हा गिर्यारोहक म्हणून कार्यरत आहे. याआधी त्याने लिंगाणा, तैल-बैला, राजधानी मोहीम , पावनखिंड मोहीम , गिरनार पर्वत अशा अनेक गडकोट व जंगल मोहिमा त्याने पूर्ण केल्या आहे . त्याने नृसिंहवाडीच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा