![]() |
वाचन संकल्प महाराष्ट्राचा या कार्यक्रमात बोलताना डॉ. संदीप तापकीर, अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे,उप प्राचार्य डॉ.विजयमाला चौगुले,डॉ. तुषार घाडगे व प्रा.संतोषकुमार डफळापूरकर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथे 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा'या उपक्रमांतर्गत मराठी विभाग व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन कौशल्य कार्यशाळा व समूह वाचन उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. संदीप तापकीर, अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, उपप्राचार्य प्रा.डॉ.विजयमाला चौगुले व प्रा.डॉ. तुषार घाटगे उपस्थित होते.
प्रमुख वक्ते डॉ. तापकीर मार्गदर्शन करताना म्हणाले की, आजचे वाचन कुंठित झाले आहे. त्यामुळे लोकांचे आयुष्य हे अर्थहीन होत चालले आहे. त्यामुळे जीवनाला अर्थपूर्ण करण्यासाठी वाचन करण्याची आवश्यकता आहे. वाचन लेखन कार्याला प्रारंभ इ.स.पूर्व काळात सुरु असून तेव्हापासून आजतागायत प्रचंड बदल होत गेले. मुळात वाचनाचे छंद ही कला आहे. वाचनामुळे तुमचं आयुष्य अर्थपूर्ण पद्धतीने बदलू शकते. वाचनामुळे मनुष्य हा ज्ञानवान बनतो. एका पुस्तकामुळे माणसाचे आयुष्याचे आयाम बदलतात. जगात सर्वात अधिक पुस्तक वाचन करणारे लोक हे जपान मध्ये आहेत. त्यामुळे जापनीज लोक हे सर्व बाबतीत परिपूर्ण असतात. पुस्तक हे मित्र व गुरू म्हणून माणसाचे जीवनक्षम करीत असल्याचे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषण करताना प्राचार्य डॉ.सुरत मांजरे म्हणाले, व्यक्ती हा ज्ञानवान, गुणवान व कीर्तीवान अर्थात परिपूर्ण बनण्यासाठी पुस्तका शिवाय दुसरा पर्याय नाही. प्रत्येक घटकांनी पुस्तकाचं नियमित वाचन केलंच पाहिजे. विद्यार्थ्यांना वैचारिक प्रगल्भ करण्यासाठी कॉलेजच्या माध्यमातून ४७००० पेक्षा विविध प्रकारची ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी आयुष्याला कलाटणी देण्यासाठी या ग्रंथाचा वापर करावा.
मराठी विभाग प्रमुख प्रा. संतोषकुमार डफळापुरकर यांनी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले.डॉ. खंडेराव खळदकर यांनी आभार व्यक्त केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जावळेकर यांनी केले.
कार्यक्रमास प्रा.डॉ.शशांक माने,डॉ. सुपर्णा संसुद्धी ,अन्य प्राध्यापकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन मराठी विभाग व ग्रंथालयाने यांनी नेटक्या पणाने केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा