![]() |
जटाधारी पेशंटला मदत करताना डॉ. रियाज अत्तार |
*प्रा.डॉ.प्रभाकर माने: मुख्य संपादक*
जयसिंगपूर : जयसिंगपूरच्या प्रसिद्ध अत्तार बाल रुग्णालय*येथे मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जात आहे. या अंतर्गत असंख्य नागरिकांनी लाभ घेतले आहेत. या शिबीराअंतर्गत निघणाऱ्या पेशंट चे योग्य निदान करून पुढे मोफत ऑपरेशन साठी नियमित पाठवले जाते. डॉ रियाज अत्तार हे स्वतः आपले लहान मुलांचे सेंटर सांभाळत हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या वयस्कर पेशंट ना पाहतात व त्या साठी आपला मौल्यवान वेळ देतात तसेच काही पेशंट ना मोफत शुगर तपासणी करून देतात व ते योग्य प्रकारे फिट आहेत की नाही हे पाहून पुढे पाठवून देतात असंख्य त्यांचे पेशंट लाबूंन येतात व त्यांचे साठी प्रयत्न करतात.
या शिबिरास अशीच एक अत्यंत गरीब एक वयस्कर जटाधारी असलेल्या महिलेला मोतिबिंदू असलेने दृष्टिदोष आला होता. सदर महिलेने अत्तार बाल रुग्णालय येथे दररोज सुरू असलेल्या मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर अंतर्गत भेट दिली.सदर महिला पेशंट चे मोफत ऑपरेशन तथा रक्त तपासणी मोफत करून देण्यात आले.पुन्हा फेर तपासणीसाठी आलेल्या जटाधारी महिला पेशंट ने आपला आनंद व्यक्त करून आशीर्वाद दिला.
सदर मोफत मोतीबिंदू शिबिरास असंख्य नागरिकांनी भेट देऊन या शिबिराचा लाभ घेतला आहे. डॉ. रियाज व नीलम अत्तार या वैद्यक जोडप्याने आजतागायत सामाजिक जाण व भान राखून नागरिकांची वैद्यकीय सेवा करण्याचे व्रत हाती घेतले आहे.
सदर मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर तपासणी हे डॉ. रियाज अत्तार यांचे अत्तार बाल रुग्णालय लॅबोरेटरी , रायझिंगसन अपार्टमेंट वैरण अड्डा जयसिंगपूर येथे असल्याची माहिती डॉ रियाज अत्तार यांनी दिली तसेच या पुढे ही हे सेवा देत राहू या बद्दल ग्वाही दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा