Breaking

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२५

*विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी एन.एस.एस. विद्यार्थ्यांचे योगदान उच्च कोटीचे : अधिष्ठाता डॉ. एम.एस.देशमुख*


मार्गदर्शन करताना डीन डॉ. एम.एस. देशमुख व डायरेक्टर मा. संजीवकुमार यादव (एन.एस.एस. विभागीय प्राधिकरण पुणे) व अन्य मान्यवर 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर :  विकसीत भारताचे  स्वप्नपूर्तीसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांचे योगदान उच्च कोटीचे असल्याचे प्रतिपादन मानव्यशास्त्र अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांनी शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरामध्ये व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एन.एस.एस. पुणे विभागीय प्राधिकरण डायरेक्टर मा.संजीवकुमार यादव होते.

       डॉ. देशमुख पुढे म्हणाले, भारतामध्ये युवकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या  जवळपास ४० टक्के पेक्षा अधिक असून या युवकांच्या कार्यक्षमतेचा वापर केल्यास खऱ्या अर्थाने भारत विकसित होण्याची शक्यता आहे. विकसित भारताचे स्वप्न राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांच्या रचनात्मक कामाच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. सध्या युवकांचे विविध क्षेत्रातील भरीव कामगिरी विविध क्षेत्राला हातभार लावणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी माय भारत पोर्टल ॲप संदर्भात डॉ.सुरज सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.

     अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना मा.संजीवकुमार यादव म्हणाले, एन.एस.एस च्या माध्यमातून गुणवत्ता पूर्ण मानव साधन संपत्ती निर्माण होत आहे. ज्यामुळे भारताला उत्कृष्ट भविष्य असल्याचे ही ते म्हणाले. यासाठी एन.एस.एस.च्या युवकांनी देशाच्या विकासासाठी कटिबद्ध असले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

    कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक  एन. एन.एस.संघ व्यवस्थापक डॉ. प्रभाकर माने यांनी केले. डॉ. प्रवीण बाबर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  यांनी केले. 

    यासाठी एन.एस.एस. संचालक डॉ. तानाजी चौगले यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी भारतातील १३ राज्यातील स्वयंसेवक विद्यार्थी व संघ व्यवस्थापक असे २४० जण उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा