![]() |
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. सुभाष अडदंडे, सोबत आप्पा मगदूम, पत्नी सुरेखा आप्पा मगदूम, पद्माकर पाटील व प्राचार्य डॉ.सुरज मांजरे |
प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मधील प्रयोगशाळा परिचर आप्पासो अण्णा मगदूम हे ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. काल ३१ जानेवारी,२०२५ रोजी जयसिंगपूर कॉलेजच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये सदिच्छा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी डॉ. सुभाष अडदंडे, पद्माकर पाटील व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे उपस्थित होते.
आप्पासो मगदूम व सरिता मगदूम यांचा येथोचित्त सत्कार डॉ. सुभाष अडदंडे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. मांजरे, उपप्राचार्य डॉ. मनीषा काळे, प्रा.भारत आलदर व डॉ. प्रभाकर माने यांनी त्यांच्याविषयी गौरव उद्गार काढले.
सत्काराला उत्तर देताना आप्पासो मगदूम म्हणाले, माझे जीवन हे या कॉलेजच्या सेवेत व संस्काररूपी प्रवासामध्ये अत्यंत यशस्वीपणे पूर्ण झाले. कॉलेजच्या प्रत्येक घटकांनी मला कुटुंबातील सदस्य म्हणून सन्मानाची वागणूक दिली. त्यांचे ऋण हे न विसरण्यासारखे आहे.
डॉ. सुभाष अडदंडे अध्यक्ष स्थानावर बोलताना म्हणाले, आप्पा मगदूम म्हणजे अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू, कडक शिस्त, विद्यार्थी प्रिय व सामाजिक संवेदनशील असणारे लाडके व्यक्तिमत्व होते. आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून सदैव सर्वांची सेवा केली.
या कार्यक्रमास मगदूम यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, प्राध्यापक वृंद, प्रशासकीय सेवक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा