Breaking

शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२५

*जयसिंगपूर कॉलेजमध्ये १११ रक्तदात्यांनी केलं रक्तदान*

 

रक्तदान शिबिर 


*प्रा.डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक*


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्ष व महात्मा गांधी यांची पुण्यतिथीचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना व एन.सी.सी. यांचे संयुक्त विद्यमाने ३० जानेवारी,२०२५ रोजी कॉलेज कॅम्पस मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १११ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

      या कामी सांगलीचे हिंदरत्न प्रकाश बापू पाटील संचलित रक्तपेढीकडून सहकार्य लाभले. या शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. शितल पाटील यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक डॉ. खंडेराव खळदकर यांनी केले.डॉ. महावीर बुरसे यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रभाकर माने यांनी केले.

    याप्रसंगी संस्थेचे सदस्य प्रा.अभिजीत अडदंडे, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, नवजीवन कॉलेजचे प्राचार्य प्रा. बोरचाटे, मुख्याध्यापिका प्रिया गारोळे, उपप्राचार्य प्रा. भारत आलदर, एनसीसी ऑफिसर. कॅप्टन प्रा.सुशांत पाटील ,प्रा.अनिल पाटील व प्रा.बी.ए.पाटील उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा