*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : येथील अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे दि. ५ एप्रिल रोजी कॉमर्स विभागातर्फे (इंग्रजी माध्यम) विद्यार्थ्यांसाठी ट्रेड फेअरचे आयोजन करण्यात आले होते. या ट्रेड फेअरला विद्यार्थी व पालक यांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांमधील व्यावसायिक दृष्टिकोन प्रत्यक्षात वृद्धिगत करण्यासाठी प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे व्यावसायिक दृष्टिकोन जोपासत विविध प्रकारच्या स्टॉलच्या माध्यमातून विविध वस्तूंची विक्री केली. ट्रेड फेअर चे उद्घाटन कु. ऋतुजा चकोते, मार्केटिंग हेड,चकोते इंडस्ट्रीज यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे उपस्थित होते.
या ट्रेड फेअर मध्ये विविध प्रकारचे फूड स्टॉल,खाद्यपदार्थ,पेय, फळे व भाज्या, ज्वेलरी ,कपडे , खेळणी यासारखी विविधता विद्यार्थ्यांनी मांडली होती. या फेअर ट्रेड मध्ये विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.या फेअर ट्रेड मध्ये व्यावसायिक म्हणून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपला सकारात्मक अनुभव कथन केला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे चेअरमन डॉ.सुभाष अडदंडे, प्रा.आप्पासाहेब भगाटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. ट्रेड फेअर चे नियोजन अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे सीईओ प्रा.अभिजीत अडदंडे, प्राचार्या सौ. प्रिया गारोळे, शैक्षणिक समन्वयक कल्याणी अक्कोळे , कॉमर्स विभागप्रमुख मा.प्रवीण नरगच्चे आणि कॉमर्स विभागातील सर्व प्राध्यापक यांनी केले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा