Breaking

शुक्रवार, ४ एप्रिल, २०२५

*उच्च ध्येय प्राप्तीसाठी आधुनिक कौशल्य आत्मसात करून यशाचा मार्ग सुकर करावा : प्रा. स्वाती बस्तवाडे*


सदिच्छा समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना प्रा. स्वाती बस्तवाडे, अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, शेजारी डॉ. प्रभाकर माने व डॉ.वंदना देवकर, प्रा.विश्रांती चव्हाण,प्रा.मेहबूब मुजावर व प्रा.ज्योती पोरे 


*प्रा.डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक*

 

   जयसिंगपूर : व्यक्तीचे जीवन आनंदमय, कल्याणकारी व सुखकर करण्यासाठी यशाचे नेमकं गणित समजून घ्यावे. तसेच उच्च ध्येय प्राप्तीसाठी आधुनिक कौशल्य आत्मसात करून यशाचा मार्ग सुकर करावा असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.स्वाती बस्तवाडे यांनी व्यक्त केले.

      ते जयसिंगपूर कॉलेज  येथे अर्थशास्त्र विभाग आयोजित पदव्युत्तर विभागाचा सदिच्छा समारंभ कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.सुरज मांजरे व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर माने उपस्थित होते.

   प्रा.बस्तवाडे मार्गदर्शन करताना म्हणाल्या, विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व हे  प्रगल्भ मन, बाह्यसंस्कार, अफाट ज्ञान ,अंतरंगी व बाह्य वैशिष्ट्यानी परिपूर्ण असावे शिक्षणाच्या प्रदीर्घ प्रवासात गुरुजन, विद्यार्थी मित्र, शिक्षक वृंद व अन्य घटकांच्या मार्गदर्शन व सहवासाने विद्यार्थ्याचे  व्यक्तिमत्व बहुआयामी बनवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असते. या कॉलेजच्या माध्यमातून येथे घडणारा प्रत्येक विद्यार्थी हा एक सुजाण नागरिक व सुसंस्कारित व्यक्ती म्हणूनच नावारुपास येत असतो. त्यापुढे म्हणाल्या, मनुष्याचे जीवन खूप सुंदर असून त्याचा आनंद पदोपदी घेणं हे आपले संस्कार व कौशल्यावर आधारित असते. यासाठी विविध प्रकारचे कौशल्य आत्मसात करून जीवनाचा प्रवास सुकर करावा. त्यापुढे म्हणाल्या,आधुनिक तंत्रज्ञान व आर्टिफिशियल इंटलिजन्सीचा आधार घेत नवीन कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले. तसेच, समाजासाठी जबाबदारीने कार्य करण्याचे आणि नीतिमूल्ये जपण्याचे महत्त्व पटवून दिले.यावेळी त्यांनी अनेक स्थानिक यशस्वी व्यक्तींची उदाहरणे देत विद्यार्थ्यांना प्रेरित करू त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा  दिल्या. त्यांच्या प्रेरणादायी भाषण व ओघवत्या शब्दांनी विद्यार्थ्यांच्या मनाला व विचारांना नवसंजीवनी दिली.

    प्राचार्य डॉ.सुरत मांजरे अध्यक्षीय भाष्य करताना म्हणाले, पदवी व पदव्युत्तर शिक्षण हे जीवनाच्या प्रगतीतील एक महत्त्वाचा पथ असून यापुढे जाऊ व्यवहारवादी जगतात आपलं अस्तित्व टिकवणे व जीवन यशस्वीपणे परिपूर्ण करावे. मात्र आई वडील, वडीलधारी मंडळी व गुरुजन यांचा मान राखणं हे नैतिक कर्तव्य आहे. आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करीत उंच शिखर पादांक्रांत करणे हे जीवनाचे ध्येय असावे. हे सर्व करण्यासाठी नीतिमूल्यांचे तंतोतंत पालन करावे.

       याप्रसंगी डॉ. प्रभाकर माने,डॉ. वंदना देवकर,प्रा. विश्रांती चव्हाण,प्रा. मेहबूब मुजावर,प्रा. ज्योती पोरे यांनी प्रेरणादायी मनोगते व्यक्त केली. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक करून गुरुजनांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.

     या कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये, विद्यार्थ्यांच्या भावनेचे बंध फुटून डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या.आत्मिक व भावनिक संवेदनशीलता या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून येत होती. विद्यार्थ्यांसाठी  स्नेह भोजनाची व्यवस्था केली होती. एम.ए.भाग १ च्या विद्यार्थ्यांनी एम.ए.भाग २ च्या विद्यार्थ्यांना मनोभावे अश्रू पूर्ण नयनानी सदिच्छारुपी निरोप दिला.एम.ए.भाग २ च्या विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्र विभागास प्राचार्यांच्या हस्ते स्टील कपाट प्रदान केले.

     स्वागत व प्रास्ताविक रफिया रांगोळे, अंजुम बुबनाळे यांनी पाहुण्यांचा परिचय ,आभार शुभांगी कुंभार व सूत्रसंचालन सोनाली साळुंखे यांनी केले. या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन एम.ए.भाग १ च्या विद्यार्थ्यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा