![]() |
रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना श्रावक श्री उल्हास आगरे, वीर सेवा दल चे स्वयंसेवक, व चंदाबाबा ग्रुपचे सदस्य |
*प्रा. चिदानंद अळोळी : उपसंपादक*
औरवाड: चंदाबाबा ग्रुप औरवाड यांच्यावतीने श्री १००८ भगवान महावीरांच्या २६२४ व्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्ताने औरवाड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन मंगळवार दि.०८/०४/२०२५ रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत श्री आदिनाथ दिगंबर जैन समाज हॉल येथे करण्यात आले होते.या शिबिरामध्ये 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले. "द्रव्यदानं परम दानम्, अन्नदानम ततोधिकम्, ततः श्रेष्ठ रक्तदानम्" या पद्धतीने रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
श्री.आदिनाथ दिगंबर जैन समाज,वीर सेवा दल, चंदा बाबा ग्रुप औरवाड यांचे वतीने रक्तदात्यांना प्रवासाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट अथवा स्टीलच्या पाण्याची बॉटल, तसेच सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या संपूर्ण शिबिरासाठी अक्षय ब्लड बँक मिरज चे कर्मचारी मयुरी हवालदार, डॉ.सुलेमान तांबोळी, नम्रता देसाई. गुलाब मुजावर, हुसेन बेंद्रेकर, ऐश्वर्या खाडे यासह वीर सेवा दल व चंदाबाबा ग्रुप यांचे विशेष सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा