![]() |
जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामतीचे जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर मध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी बी.ए.,बी. कॉम. व बी.एस्सी.,बी.सी.ए., बी.सी.एस.,बी.वॉक प्रिंटिंग-प्रेस व ऑटोमोबाईल भाग -१ या पदवी शाखेच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. या विभागाच्या जागा मर्यादित असल्याने विद्यार्थ्यांनी संबंधित विभागातील प्राध्यापकांशी लवकरात लवकर संपर्क साधावा.त्याचबरोबर एम.ए.अर्थशास्त्र, मराठी ,हिंदी, एम.कॉम.व एम.एस्सी. केमिस्ट्री या पदवीव्युत्तर विभागाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत.
अनुदानित तुकड्यांची प्रवेश संख्या मर्यादित असल्याने विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी त्वरित कॉलेजशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी केले आहे.
जयसिंगपूर कॉलेज हे शिरोळ तालुक्यातील शैक्षणिक व वैचारिक केंद्र बनले असून कॉलेजचे वैशिष्ट्य म्हणजे शिरोळ तालुक्यातील शैक्षणिक दृष्ट्या गुणवत्तापूर्ण व पायाभूत सोयी सुविधांनी सज्ज असे एकमेव कॉलेज आहे. शिरोळ तालुकास्तरीय शालेय स्पर्धेसाठी उपलब्ध असणारे एकमेव क्रीडांगण येथे आहे. जयसिंगपूर कॉलेज हे शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात लोकप्रिय असून क्रीडा,कला व सांस्कृतिक, स्पर्धा परीक्षा केंद्र, मूल्य व कौशल्य आधारित अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वावलंबी करणारे कॉलेज म्हणून नावारूपास आहे. एन.सी.सी. व राष्ट्रीय सेवा योजना या विभागाच्या माध्यमातून विद्यार्थी व समाजाच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे. जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या माध्यमातून कला व सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारे एकमेव महाविद्यालय,माजी प्राचार्य डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे स्मृति व्याख्यानमाला, शेतकरी केंद्रित नांगरट साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सकस वैचारिक शिदोरी देणारे वैचारिक केंद्र बनले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा