![]() |
अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, जयसिंगपूर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : येथील अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांच्यामार्फत दहावी उत्तीर्ण विद्यार्थी व पालकांसाठी विशेष अशा करियर मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांचे परीक्षेतील गुण, आवड-निवड व उपलब्ध संधी यांची सांगड घालून योग्य करिअर निवड व करियरसाठी विविध वाटा कोणत्या आहेत यासंबंधी मार्गदर्शन करणाऱ्या महत्त्वपूर्ण सेमिनारचे आयोजन सोमवार दि. १९ मे २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर मधील कॉन्फरन्स हॉल येथे करण्यात आले आहे.
या सेमिनार साठी करिअर कौन्सिलर व प्रेरक वक्ते ॲड. प्रवीण नरगच्चे ( CS,BSL,LLB) आणि इंजि.अभय खोत (BE Mechanical) या तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. नुकत्याच झालेल्या दहावीच्या निकालानंतर पालक व विद्यार्थ्यांमध्ये करियर निवडीबाबत असणारा संभ्रम लक्षात घेता या सेमिनारला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
1) Mr. Abhijeet Adadande
Mob. 8275450655 (Manager)
2) Mrs. Priya Garole (Principal)
Mob. 9763514907
3) Mr. Vaibhav Talandage
Mob. 9975144515
4) Mr. Kedar Patil
Mob. 9371111750
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा