Breaking

शनिवार, १७ मे, २०२५

*जयसिंगपूरच्या डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकीच्या आठ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड*


डॉ.जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, जयसिंगपूर 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


 जयसिंगपूर : येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील कॉम्प्युटर,आय.टी.व इलेक्ट्रॉनिक टेली कम्युनिकेशन या तीन विभागामधील आठ विद्यार्थ्यांची निवड प्रोमॅक्सिस सॉफ्टवेअर सोल्युशन  व विप्रो पारी  प्रा. लिमिटेड या कंपनीमध्ये निवड झाली आहे.

       कॉम्प्युटर विभागाच्या शर्वरी कुलकर्णी ताहुरा शेख, आयटी विभागाच्या  श्रेयश देशमाने, अभिषेक मगदूम, श्रेया  माने व इलेक्ट्रॉनिक टेली कम्युनिकेशन विभागाच्या राधेय पेंडूरकर, श्वेता जाधव, दक्षा निकम, या विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली आहे. ए. आय, ऑटोमेशन, सॉफ्टवेअर, रोबोटिक्स  व तत्सम अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये काम करणाऱ्या कंपन्यांच्या बरोबर आमच्या महाविद्यालयाचे सामंजस्य करत असल्यामुळे  हे शक्य होते असे मत  प्राचार्य डॉ. गोपाळ मुलगुंड यांनी व्यक्त केले.

      ट्रस्टचे चेअरमन डॉ.विजयराज मगदूम, प्राचार्य, डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

        ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी. पी. माळगे, विभाग प्रमुख व ट्रेनिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा