![]() |
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण कोल्हापूर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : कळंबा रोड येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ऑगस्टमधील प्रवेश सत्राकरिता व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबईच्या आदेशानुसार, ३० व्यवसायांमध्ये १३८८ जागेकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया १५ तारखेपासून सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज.http://admission.dvet.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावेत. तसेच अर्ज स्वीकृतीकरिता राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत समक्ष येऊन अर्ज निश्चित करावा, असे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
या कौशल्य आधारित प्रशिक्षण संस्थेच्या सुवर्णसंधीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा