Breaking

बुधवार, २१ मे, २०२५

*संकेत बोरगे व महेश शिंदे या विद्यार्थ्यांची प्लेसमेंट द्वारे आफ्रिका व दुबई या देशात निवड*

 

 (बी.व्होक. ऑटोमोबाईल आणि प्रिंटिंग अँड पब्लिशिंग विभाग)

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : येथील अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मधील बी.व्होक. ऑटोमोबाईल आणि प्रिंटिंग अँड पब्लिशिंग या विभागातील संकेत बोरगे व महेश शिंदे या दोन विद्यार्थ्यांची  प्लेसमेंट द्वारे क्रिएटिव पॅकेजिंग, ईस्ट आफ्रिका आणि रीप्रो क्लेस, दुबई  या देशात झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. सुरज मांजरे यांनी दिली.

     या अगोदर ही ३२ विद्यार्थ्यांची देशातील विविध अग्रगण्य कंपन्यांमध्ये प्लेसमेंट द्वारे निवड झाली होती.

  संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार पद्माकर पाटील, अन्य पदाधिकारी, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच समन्वयक डॉ.पी.पी. चिकोडे, विभाग प्रमुख प्रा. सुरज गिरमल, प्रा. प्रज्ञा लंबे व प्रा.आरती गुरव यांचे विशेष सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा