![]() |
अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : येथील अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला असून या वर्षीही त्याच निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे. एस.एस.सी. बोर्ड परीक्षा २०२५ मध्ये गुणाानुक्रमे प्रथमस्थानी कु.पूर्वा जाधव ९१.४०% , द्वितीय कु.प्रणिती पाटील ९१.२०% व तृतीय स्थानी प्रज्वल चौगुले ८९.२०% हे विद्यार्थी आहेत.
तसेच एच.एस.सी ( कॉमर्स व सायन्स) बोर्डाचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये कॉमर्स विभागातील (इंग्रजी माध्यम) मधील कु.पियुष रजपूत ८१.५०%, कु.संवेद चव्हाण ८१.१७% आणि कु.रिजवान कडेगावकर ७८% , तसेच सायन्स विभागातील श्री. शिवराज पाटील ६९.३३%, कु.जान्हवी अडदंडे ६८.५०%, कु.स्नेहल कोळी ६१.१७% आणि कु.मानसी पाटील ६१.१७ टक्के अनुक्रमे गुण मिळवून ज्युनिअर कॉलेजच्या उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
सदर विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे, डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार पद्माकर पाटील, सर्व सन्माननीय सदस्य, मॅनेजर, प्राचार्या, शैक्षणिक समन्वयक,कॉमर्स आणि सायन्स विभागातील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा