Breaking

गुरुवार, २६ जून, २०२५

*लोक कल्याणकारी व मानवतावादी दृष्टिकोन जोपासणारा कृतीशील राजा : प्राचार्य डॉ. सुरत मांजरे*

 

छ. शाहू महाराज जयंती निमित्त शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करताना प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व प्राध्यापकवृंद 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : छ. शाहू महाराज हे  समतावादी,मानवी मूल्य,लोककल्याण व मानवतावादी दृष्टिकोन जोपासणारा कृतीशील राजा असल्याचे मत प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथे राजर्षी  छ.शाहू महाराज यांच्या १५१ वी जयंती प्रसंगी व्यक्त केले.

   याप्रसंगी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, छ.शाहू महाराज हे केवळ एक राजा नसून ते ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचे राजे होते. सामाजिक समता व न्यायाचे प्रणेते, शिक्षणप्रेमी आणि बहुजन हिताय काम करणारे मोठ्या मनाचे राजे होते. कोल्हापूर संस्थानाच्या अर्थात कोल्हापूर जिल्ह्याच्या सामाजिक, कृषी व औद्योगिक, शैक्षणिक, कला, क्रीडा ,सांस्कृतिक  व भौतिक क्षेत्रात भरीव योगदान दिले. तसेच सामाजिक परिवर्तनाच्या  प्रक्रियेत कृतिशीलपणे बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. राधानगरी व कोल्हापुरी बंधारे, सक्षम व उत्तम जल व्यवस्थापनाच्या  माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम केले. मुळात सामाजिक आरक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर सामाजिक समतेची मुहूर्तमेढ रोवली. सक्षम राष्ट्र व समाज परिवर्तनामध्ये त्यांचे योगदान अनन्यसाधारण असे होते.

       प्रारंभी उपप्राचार्य प्रा.डॉ. एम. व्ही.काळे व प्रा.डॉ.एस.एस. महाजन यांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. स्वागत व प्रास्ताविक प्रा.डॉ.टी.जी.घाटगे यांनी केले.

       याप्रसंगी कॉलेजमधील प्राध्यापक वृंद,कार्यालयीन अधीक्षक संजय चावरे, प्रशासकीय सेवक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा