Breaking

बुधवार, २ जुलै, २०२५

*शिक्षणच सक्षम राष्ट्रनिर्मितीचा मार्ग : ॲड.श्रीकांत माळकर यांचे मत*


 मार्गदर्शन करताना प्रेरक वक्ते ॲड. श्रीकांत माळकर, डॉ. महावीर अक्कोळे, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, उपप्राचार्य प्रा. भारत आलदर,डॉ. महावीर बुरसे, प्रज्ञा माळकर व प्रा. अंजना चावरे 

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : “सक्षम राष्ट्रनिर्मितीसाठी उत्तम शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही,” असे ठाम प्रतिपादन प्रेरक वक्ते ॲड. श्रीकांत माळकर यांनी केले. जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी स्थानिक समितीचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, उपप्राचार्य प्रा.भारत आलदर व पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे उपस्थित होते.

     आपल्या भाषणात ॲड. माळकर राजर्षी शाहू महाराजांच्या शिक्षणविषयक योगदानाचा गौरव करताना सांगितले की, “प्राथमिक शिक्षण सक्तीचे करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे ऐतिहासिक कार्य शाहू महाराजांनी केले. त्यातूनच शिक्षणाचा व्यापक प्रचार व प्रसार सुरू झाला. आपण ज्या मातीमध्ये जन्म घेतो, त्या मातीशी नाळ जोडणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी शाहू महाराजांचे जल व्यवस्थापन, सामाजिक, शैक्षणिक, कृषी व आर्थिक क्षेत्रातील योगदान अधोरेखित केले. अनेक महापुरुषांच्या जडणघडणीत शाहू महाराजांचे योगदान व कृतिशील कार्याबाबत गौरव उद्गार काढले.

  अध्यक्षीय स्थानावरून बोलताना डॉ. महावीर अक्कोळे यांनी शाहू महाराजांच्या समतावादी विचार व अंधश्रद्धा निवारण संदर्भातचे भाष्य केले. ते पुढे म्हणाले, शाहू महाराजांच्या समतावादी व पुरोगामी विचारांचे पाईक झाले पाहिजे. आजचा विद्यार्थ्याने अंधश्रद्धाळू न बनता डोळस बनले पाहिजेत.

     याप्रसंगी कु.प्रज्ञा श्रीकांत माळकर यांनी महापुरुषांचा जाजवल्यपूर्ण इतिहास व चरित्राचे वाचन करून स्वतःच जीवन समाजमय, विकासमय व मंगलमय केलं पाहिजे.विद्यार्थ्यांनी नेहमीच महापुरुषांचे विचार,तत्त्वज्ञान व कृतीचे अनुसरून केले पाहिजे.

     कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.अंजना चावरे यांनी करून दिला. उपप्राचार्य प्रा.भारत आलदर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा.विशाल बडबडे यांनी केले.

       याप्रसंगी प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्र उभे करण्याचा निर्धार या ॲड.श्रीकांत माळकर यांच्या प्रभावी भाषणातून व्यक्त झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा