![]() |
सहविचार सभेत मार्गदर्शन करताना डॉ. सुरज मांजरे |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : येथील अनेकांत एज्युकेशन सोसायटी चे जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये मंगळवार दिनांक १७ जून,२०२५ रोजी झालेल्या सहविचार सभेत मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. सुरत मांजरे म्हणाले, आपण सर्वांनी विद्यार्थी व समाज घटक केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध होऊन सर्वांनी प्रयत्नशील व्हावे.
ते पुढे म्हणाले, समस्त प्राध्यापकांनी नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थी हित व कल्याण डोळ्यासमोर ठेवून त्या अनुषंगाने शैक्षणिक वर्षातील विषयनिहाय शैक्षणिक दिनदर्शिका तयार करून त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. यासाठी बहुविद्याशाखीय पार्श्वभूमीवर ज्ञान व माहितीचे आदान व प्रदान करणे, कौशल्य आधारित अभ्यासक्रम, शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांच्या अभिरुची वर भर देणे. कृतिशील विचारांना चालना देणे, ग्रंथालय व अभ्यासिका यांचा पुरेपूर वापर करण्यास प्रवृत्त करणे, क्रीडा विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय खेळाडू करण्यासाठी सक्षम बनवणे, विज्ञान शाखेच्या माध्यमातून वैज्ञानिक व संशोधन वृत्तीला प्राधान्य देणे, कॉलेज कॅम्पस मधील भौतिक सुविधांचा वापर विद्यार्थ्यांनी करावा तसेच तंबाखूमुक्त, स्वच्छ व ग्रीन कॅम्पस साठी प्राध्यापकांनी जबाबदारी स्वीकारावी,
डॉ.मांजरे पुढे म्हणाले, कॉलेज हे संस्काराचे व विद्येचे ज्ञान केंद्र बनवण्यासाठी प्राध्यापकांनी विविध कार्यशाळा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स आयोजित करावे, कॉलेजच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना नामी संधी उपलब्ध करून राष्ट्रीय पातळीवरील उत्तम कलाकार निपजले पाहिजेत. ऑटोमोबाईल व प्रिंटिंग प्रेस या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक बनवण्यासाठी भर दिला पाहिजे. फूड सायन्स विभागाच्या माध्यमातून विद्यार्थी स्वावलंबी व व्यावसायिक बनले पाहिजे.
तसेच कॉलेजमधील वातावरण, शिस्तबद्ध, अभ्यासपूर्ण, स्पर्धात्मक व आनंदी राहण्यासाठी प्राध्यापकांनी कॅम्पस सुपरव्हिजनच्या माध्यमातून उत्तम कार्य करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करून विद्यार्थी व पालक सभा आयोजित करावी. कॉलेजमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निर्भया पथक, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विषयावरील व्याख्यानमालाचे आयोजन, विज्ञान प्रदर्शन, विद्यार्थ्यांसाठी ट्रेड फेअर, विविध सांस्कृतिक स्पर्धा, विविध उपक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्ती करणे, एन.सी.सी. व राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारी व सेवाभावी कार्य करण्यास प्रोत्साहित करणे. माजी विद्यार्थी ॲल्युमनी असोसिएशनच्या माध्यमातून जुन्या आठवणीना उजाळा देणे, शैक्षणिक बांधीलकी, वैचारिक आदान प्रदान करणे, कॉलेज व समाजप्रती जबाबदार व नातेसंबंध जोपासण्याचे कार्य करण्याबाबत मार्गदर्शन केले.
शासनाच्या वतीने प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांना ३ वर्षाचा अतिरिक्त सेवा कार्य मिळाल्याबद्दल व संजय चावरे यांची कार्यालयीन अधीक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
उपप्राचार्य प्रा.डॉ.विजयमाला चौगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.उपप्राचार्य प्रा.डॉ.एम.व्ही.काळे यांनी शैक्षणिक माहिती दिली. प्रा.डॉ.तुषार घाटगे यांनी NAAC बाबत सविस्तर माहिती दिली. आभार डॉ.एस.आर.नकाते यांनी मानले.
या बैठकीस उपप्राचार्य प्रा.डॉ. एम. व्ही काळे,प्रा.डॉ. विजयमाला चौगुले,डॉ.एस.आर.नकाते, NAAC कॉर्डिनेटर प्रा.डॉ.तुषार घाटगे, कार्यालयीन अधीक्षक संजय चावरे व प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा