Breaking

शनिवार, २१ जून, २०२५

*जयसिंगपूर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा*

 

आंतरराष्ट्रीय योग दिन 


प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक


जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. शारीरिक शिक्षिका प्रा. अमृता पाटील यांनी योग आसनांची प्रात्यक्षिके सादर करून आसनांची शास्त्रशुद्ध माहिती दिली. उपस्थित सर्व घटकांनी विविध आसनांच्या माध्यमातून योगाचा आनंद घेतला.

     प्रारंभी प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांनी सर्वांचे स्वागत करून मार्गदर्शन करताना म्हणाले, २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन असून जागतिक एकतेचे प्रतीक आहे.या दिनाच्या माध्यमातून सांस्कृतिक, ऐतिहासिक व आरोग्य संपन्न सजगतेचे नवीन सक्षम प्रणाली निर्माण होते.योग हा भारतीय संस्कृतीचे अमूल्य देणगी असून त्यामध्ये शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याचे संतुलन राखण्याची ताकद आहे. या दिनामुळे संपूर्ण वैश्विक पातळीवर योगाचे महत्त्व आणखी अधोरेखित होत आहे.

      या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्रा. सुशांत पाटील व एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी केले. या योग शिबिरात कॉलेजचा प्राध्यापक वृंद, प्रशासकीय सेवक व कर्मचारी, एन.सी.सी. कॅडेट्स व एन.एस.एस स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील चौगुले यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा