Breaking

रविवार, २२ जून, २०२५

जयसिंगपूर कॉलेजमध्ये देशी झाडांची लागवड — पर्यावरण रक्षणासाठी प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा पुढाकार

 

जयसिंगपूर कॉलेजमध्ये वृक्षारोपण करताना प्राचार्य डॉ. मांजरे व प्राध्यापक वृंद 


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर :  – जागतिक पर्यावरण दिन व मुख्यमंत्री वृक्ष लागवड मोहिमेच्या निमित्ताने शनिवार दि. २१ जून २०२५ रोजी जयसिंगपूर कॉलेज येथे एक भव्य वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला. यावेळी विविध देशी व जंगली झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात कॉलेज कॅम्पसमध्ये करण्यात आली. परिसरात वड,करंजी, चिंच, कडुलिंब, पिंपळ, निलगिरी, बहावा, महोगणी यांसारखी जीवनोपयोगी आणि पर्यावरण पूरक झाडे तसेच विविध फळझाडे अशी एकूण १५८ वृक्षांचे रोपण करून निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

     विशेष करून वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र विभाग यांच्या सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), एन.सी.सी., प्राध्यापक वृंद, प्रशासकीय सेवक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवून परिसर हिरवळीत न्हालून टाकला.

   या उपक्रमासाठी संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार पद्माकर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले, तर कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरज मांजरे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली संपूर्ण उपक्रम यशस्वीपणे पार पडला. उपप्राचार्य प्रा.डॉ. एम.व्ही.काळे, प्रा. डॉ. सचिन पाटील, प्रा.डॉ. सुरज उमडाळे, प्रा.बी.ए.पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. प्रभाकर माने, प्रा.डॉ. खंडेराव खळदकर व लेफ्टनंट प्रा. सुशांत पाटील व कार्यालयीन अधीक्षक संजय चावरे यांचा सक्रिय सहभाग होता.


   या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जाणीव वाढीस लागेल व भविष्यात हिरवे, स्वच्छ आणि निरोगी जीवन घडवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून ही मोहिम सर्वत्र गौरवली जात आहे.या पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने हे एक सकारात्मक पाऊल ठरत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा