![]() |
प्रज्ञा कुमार शिंदे हिचा सत्कार करताना प्राचार्य डॉ. गोपाळ मुलगुंड व अन्य प्राध्यापक |
*प्रा. मेहबूब मुजावर : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : येथील डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल विभागाच्या प्रज्ञा कुमार शिंदे यांची स्थापत्य अभियंता सहाय्यक पदी निवड झाली.
महाराष्ट्र शासनाच्या स्थापत्य अभियंता सरळ सेवा भरती ( पी.सी.ओ.) परीक्षा उत्तीर्ण होऊन पाटबंधारे प्रकल्प पुणे या ठिकाणी त्यांची स्थापत्य सहाय्यक अभियंता म्हणून नियुक्ती झाली आहे. कु. प्रज्ञा ह्या डॉ.जे.जे.मगदूम महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी असून आज पर्यंत महाविद्यालयाने केलेली मदत, उपलब्ध करून दिलेल्या सेवा सुविधा, ग्रंथालय,सिव्हिल विभाग प्रमुख व प्राध्यापकांच्या सहकार्याबद्दल कु. प्रज्ञाने प्रशंसा करून कृतज्ञता व्यक्त केली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ मुलगुंड यांनी कु. प्रज्ञाचा बुके व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा