Breaking

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०२५

*शिक्षणमहर्षी डॉ. जे. जे. मगदूम यांच्या १३व्या पुण्यतिथीला कृतज्ञतापूर्वक अभिवादन*


डॉ.जे.जे. मगदूम यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना चेअरमन डॉ. विजयराज मगदूम, कार्यकारी संचालक डॉ. सुनील आडमुठे, प्राचार्य डॉ. मूलगुंड व अन्य मान्यवर 



*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे संस्थापक चेअरमन व शिक्षणमहर्षी डॉ. जे. जे. मगदूम यांच्या १३व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्मरण करण्यात आले.याप्रसंगी ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजयराज मगदूम यांच्या हस्ते पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले.

    डॉ. विजयराज मगदूम यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, “डॉ. जे. जे. मगदूम यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर शैक्षणिक ट्रस्टची स्थापना करून, खडतर परिस्थितीतही संस्था उभारण्याचा आदर्श घालून दिला.”

      "डॉ. मगदूम हे दूरदृष्टी व कार्यतत्परतेचे मूर्तिमंत प्रतीक होते,” असे कार्यकारी संचालक डॉ. सुनील आडमुठे यांनी गौरवोद्गार काढले. “संस्थेच्या यशासाठी विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग गरजेचा आहे,” असे प्राचार्य डॉ. मुलगुंड यांनी मत व्यक्त केले.

   कार्यक्रमाला सर्व डीन, विभाग प्रमुख, रजिस्ट्रार तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्रंथपाल डी. आर. माने यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा