Breaking

गुरुवार, ७ ऑगस्ट, २०२५

*डॉ. मगदूम अभियांत्रिकीच्या श्रद्धा पाटीलची दुय्यम अभियंता पदी निवड*


दुय्यम अभियंता पदी श्रद्धा पाटील हिचा सत्कार करताना डॉ. विजयराज मगदूम व प्रा.पाटील


*प्रा.डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक*


     डॉ. जे. जे.मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल विभागाच्या कु. श्रद्धा पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अतंर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका इथे दुय्यम अभियंता पदी निवड झाली.

          महाराष्ट्र शासनाच्या एम.पी.एस.सी. अंतर्गत घेण्यात येणाऱ्या  परीक्षा उत्तीर्ण होऊन  त्यांची सहाय्यक अभियंता म्हणून निवड झाली आहे.

     कु. श्रद्धा पाटील ह्या डॉ.जे.जे.मगदूम महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी आहेत. ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजयराज मगदूम यांनी पुष्पगुच्छ देऊन श्रद्धाचे अभिनंदन केले.महाविद्यालयाचे झालेले सहकार्य, उपलब्ध करून दिलेल्या सेवा सुविधा, ग्रंथालय यासह विभाग प्रमुख व प्राध्यापकांच्या सहकार्याबद्दल त्यांनी महाविद्यालयाची प्रशंसा करून कृतज्ञता व्यक्त केली.

      ट्रस्टचे  चेअरमन डॉ.विजय मगदूम, व्हॉइस चेअरपर्सन डॉ.सोनाली मगदूम, एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे   महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ मुलगुंड विभाग प्रमुख डॉ. जे. एस.लंबे, डीन व प्राध्यापकांनी  कु. श्रद्धा पाटीलचे  अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा