![]() |
साहित्यिक प्रा.डॉ. उन्मेश शेकडे यांच्या बालकाव्यसंग्रहाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. उन्मेष मारोती शेकडे यांच्या ‘शाळंची पाखरं’ या अनोख्या बालकाव्यसंग्रहाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये राज्य विक्रम म्हणून नोंद झाली आहे. राज्यस्तरीय या यशाची घोषणा रेकॉर्ड बुकचे मुख्य संपादक डॉ. सुनील दादा पाटील यांनी अधिकृत पत्रकाद्वारे केली.
प्रा. डॉ. शेकडे यांनी लिहिलेला ‘शाळंची पाखरं’ हा जगातील पहिलाच पंचाक्षरी काव्यसंग्रह असून तो बालमानसिकतेचा शाळेच्या पहिल्या दिवसातील भावविश्वातून घेतलेला नाविन्यपूर्ण साहित्य प्रयोग ठरला आहे. एकूण ७४ कविता, ३९५ कडवी, १५८२ ओळी आणि २९१ यमक जुळणीसह हा संग्रह वैश्विक साहित्यविश्वात वेगळेपणा निर्माण करणारा ठरला आहे.
बालमनाच्या निरागस आठवणी, शाळेच्या पहिल्या टप्प्यातील उत्सुकता आणि भीती यांचा संगम साधणारा हा संग्रह महाराष्ट्रासह जागतिक पातळीवरही विशेष ठरला आहे. त्यांच्या या विक्रमप्राप्त कार्याची नोंद १५ ऑगस्ट २०२५ रोजी अधिकृत करण्यात आली.
प्रा. डॉ. उन्मेष शेकडे हे सध्या स्वामी विवेकानंद महाविद्यालय, शिरूर ताजबंद येथे प्राध्यापक आहेत. त्यांनी कविता, नाटक, कादंबरी आणि समीक्षा लेखनासोबतच शोधनिबंध व चर्चासत्रांमध्येही मोलाचे योगदान दिले आहे.
या नोंदणी प्रक्रियेस भागवत खंडापुरे, नंदकुमार बालूरे, रामचंद्र चव्हाण, संजीवनी भिंगारे आणि प्रिन्स सुनील पाटील यांनी निरीक्षक व साक्षीदार म्हणून उपस्थिती दर्शवली.या प्रेरणादायी यशाबद्दल प्रा. डॉ. शेकडे यांचे साहित्यिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा