Breaking

गुरुवार, २८ ऑगस्ट, २०२५

*भित्तीपत्रक म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व कल्पकतेला वाव देणारे एक माध्यम : अशोक शिरगुप्पे यांचे प्रतिपादन*


मार्गदर्शन करताना मा. अशोक शिरगुप्पे, अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. विजयमाला चौगुले,डॉ. प्रभाकर माने व डॉ. वंदना देवकर


*अग्रजा कांबळे : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर : भित्तीपत्रक म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व कल्पकतेला वाव देणारे एक माध्यम असल्याचं मत संस्थेचे संचालक व माजी मुख्याध्यापक अशोक शिरगुप्पे यांनी प्रतिपादित केले. त्या जयसिंगपूर कॉलेजच्या अर्थशास्त्र विभाग आयोजित भित्तीपत्रक उद्घाटन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. विजयमाला चौगुले व अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर माने उपस्थित होते.

      बी.ए. भाग ३ चे अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी भारतीय अर्थव्यवस्था या थीमवर आधारित भित्तीपत्रके सादर केली.भित्तीपत्रकाचे उद्घाटन संस्थेचे संचालक व माजी मुख्याध्यापक अशोक शिरगुप्पे यांच्या हस्ते पार पडले.

 अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य प्रा.डॉ. विजयमाला चौगुले म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी केलेली भित्तीपत्रके हे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणारी असून भविष्यात विद्यार्थ्यांच्या कौशल्यपूर्ण करिअरला सुसंगत आहे.

    या उपक्रमास प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांची प्रेरणा,मार्गदर्शन व सहकार्य लाभले. प्रा. डॉ. वंदना देवकर, प्रा. मेहबूब मुजावर,ज्योती पोरे व प्रा. गणेश कुरळे आदी मान्यवर उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कु.श्रावणी माने व सूत्रसंचालन प्रा. विश्रांती चव्हाण यांनी केले तर आभार  प्राची कांबळे यांनी मानले. याप्रसंगी कोमल कोळी, शाहिद सय्यद, अग्रजा कांबळे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा