Breaking

शनिवार, ३० ऑगस्ट, २०२५

*माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवर (IMF) कार्यकारी संचालकपदी नियुक्ती*

 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


नवी दिल्ली : माजी रिझर्व्ह बँक गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) कार्यकारी मंडळावर कार्यकारी संचालक (Executive Director) म्हणून निवड करण्यात आली आहे. भारत सरकारच्या Appointments Committee of the Cabinet ने 29 ऑगस्ट 2025 रोजी ही नियुक्ती जाहीर केली.

    पटेल यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी करण्यात आली असून ते भारतासोबत बांगलादेश, भूतान आणि श्रीलंका या देशांचेही IMF मध्ये प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांनी या पदावर डॉ. कृष्णमूर्ती सुव्रमानियन यांची जागा घेतली आहे.

   आंतरराष्ट्रीय आर्थिक धोरणांसंबंधी निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग, सदस्य देशांना वित्तीय मदत व धोरणात्मक मार्गदर्शन ही महत्त्वाची जबाबदारी आता उर्जित पटेल यांच्यावर येणार आहे.

  डॉ. पटेल यांनी यापूर्वी IMF मध्ये अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम केले असून, RBI चे गव्हर्नर (2016-2018) व उपगव्हर्नर म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण कारकीर्द बजावली आहे. तसेच Asian Infrastructure Investment Bank (AIIB) मध्ये उपाध्यक्ष व National Institute of Public Finance and Policy (NIPFP) चे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

    त्यांच्या या नियुक्तीमुळे भारताचे जागतिक आर्थिक मंचावरचे प्रतिनिधित्व अधिक प्रभावी होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा