![]() |
सामाजिक कार्यकर्ते व संवेदनशील युवा नेते मा. जोतिराम जाधव |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : आगामी जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय समीकरणे रंगतदार होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते जोतिराम जाधव यांनी शहरातील विविध प्रभागामधून चार उमेदवार निवडणुकीत उभे करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यामुळे ते स्वतंत्र आघाडी स्थापन करणार की विद्यमान आघाड्यांपैकी कुठल्या आघाडीत सामील होणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
जोतिराम जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजकारणात अग्रेसर असून त्यांचा जनतेशी दैनंदिन संपर्क कायम राहिला आहे. शिरोळ तालुक्यात ‘धनंजय महाडिक युवाशक्तीच्या माध्यमातून त्यांनी कार्यक्षम युवकांचे जाळे उभे केले असून, या व्यासपीठातून सामाजिक कार्य, महिला सबलीकरण, व्यसनमुक्ती, सांस्कृतिक उपक्रम तसेच कला व क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे.
विशेषत: जयसिंगपूरातील राजीव गांधीनगर परिसरात ते अत्यंत सक्रिय आहेत. मोरया गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून युवक व महिला जनजागृतीसाठी सातत्याने उपक्रम राबवले जातात. त्यांच्या पुरोगामी, कृतिशील आणि समाजाभिमुख विचारांना शहरातील महिला व तरुण वर्गासह नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
राजकारणापासून जाणीवपूर्वक दूर राहूनही, ‘राजकारणातील गटारगंगा स्वच्छ करण्यासाठीच मी मैदानात उतरत आहे’, तसेच झोपडपट्टी वासियांचे भौतिक प्रश्न, अडचणी व सामाजिक समस्या सोडवण्यासाठी जाधव यांनी आपल्या लढाईचे धोरण स्पष्ट केले. आतापर्यंत केलेल्या कामाच्या बळावर व लोकसंपर्काच्या जोरावर त्यांनी चार उमेदवार उभे करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
यामुळे जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीत नवीन समीकरणे निर्माण होण्याची दाट शक्यता असून, युवकांच्या नेतृत्वातून उभा राहणारा हा पर्याय कितपत प्रभावी ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाऊ सांगतील तेच धोरण
उत्तर द्याहटवामी देखील एक जोतीराम जाधव भाऊंचा निष्ठावंत कार्यकर्ता
कुठल्या मार्गातून कस निर्माण व्हायचं हे देखील त्यांच्या कडूनच शिकलो
एक विचारवंत व अभ्यासू नेतृत्व म्हणजे भाऊ 🙏