![]() |
मार्गदर्शन करताना संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजयमाला चौगुले |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेजच्या मानसशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक आत्महत्या प्रतिबंधक या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना आत्महत्या टाळून सकारात्मक जीवन जगण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन कॉलेजच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे तर मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. विजयमाला चौगुले उपस्थित होते.
प्रारंभी विद्यार्थ्यांना आत्महत्या विरोधी दोन प्रभावी व्हिडिओ दाखविण्यात आले. त्यानंतर मार्गदर्शन करताना डॉ. अक्कोळे यांनी विद्यार्थ्यांना “मनुष्याच्या जीवनात नैराश्याचे क्षण येतातच; मात्र स्वप्न आणि ध्येयाचा विचार, कुटुंबीयांची साथ तसेच समाजातील वंचित घटकांचे आयुष्य पाहिले तर आत्महत्येपासून दूर राहून आयुष्य अधिक सुंदर वाटते” असा संदेश दिला. याप्रसंगी त्यांनी महात्मा गांधींच्या जादूचा ताईत ची आठवण करून दिली तसेच नवशिक्या डॉक्टर पायल पडवी व किल्लारी भूकंपातील अनुभवांद्वारे जीवन मूल्यांची उदाहरण दिली. आत्महत्या प्रतिबंध करण्यासाठी टेली मानस या शासकीय समुपदेशन केंद्राची माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी “जीवन हे सुंदर आहे; आनंदी व समाधानी राहणे ही खरी कौशल्य आहेत” असे सांगत विद्यार्थ्यांना सकारात्मकतेचा धडा दिला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. विजयमाला चौगुले यांनी केले. आभार प्रा. वर्षा चौगुले यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी केले.
या कार्यक्रमास अधीक्षक संजय चावरे, प्रा. गणेश कुरळे, प्रा. सत्यजित माने यांच्यासह अन्य प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा