![]() |
मार्गदर्शन करताना प्रा. सुनील चौगुले, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व प्रा.डॉ. विजयमाला चौगुले,प्रणव बिराजे |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : आधुनिक तंत्रज्ञान व समाज माध्यमाच्या काळातही शिक्षकांनी संस्कारक्षम पिढी घडविण्याचे कार्य केले आहे. त्यामुळे “शिक्षण हेच खरे समतेचे व समाज उद्धाराचे शस्त्र आहे”, असे प्रतिपादन प्रा. सुनील चौगुले यांनी केले.
जयसिंगपूर कॉलेजमध्ये मानव्य विद्याशाखेच्या वतीने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षण दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी डॉ. सुरत मांजरे तर उपप्राचार्य प्रा.डॉ. विजयमाला चौगुले उपस्थित होत्या.
प्रारंभी महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांच्या शिक्षणविषयक विचारांचा जागर झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी एकदिवसीय शिक्षक म्हणून अध्यापन कार्य केले. तसेच विद्यार्थ्यांच्या मनोगतातून शिक्षकांविषयी आदर व सन्मानभाव व्यक्त झाला. प्रणव बिराजे या विद्यार्थ्याने एकदिवसीय प्राचार्य म्हणून प्रशासकीय जबाबदारी सांभाळली व मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.डॉ. विजयमाला चौगुले यांनी केले. आभार असीम शेख यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.प्रभाकर माने यांनी केले.
या कार्यक्रमास अधीक्षक संजय चावरे, प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा