![]() |
प्रमुख पाहुणे डॉ. धवल पाटील, उपप्राचार्य प्रा. भारत आलदर, पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे,प्रा. सुनील चौगुले, प्रा. सुशांत पाटील व अन्य मान्यवर |
*प्रा.सौ.अंजना चावरे : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेजच्या कनिष्ठ विभागामार्फत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. धवल पाटील तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. पाटील म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्यासाठी शिक्षकांची भूमिका फार महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपले जीवन यशस्वी करावयाचे आहे. प्रत्येकाने आपल्या मनाला Why आणि What असे प्रश्न विचारावेत, याच प्रश्नांची उत्तरे म्हणजेच आपले आयुष्य घडवणारी ठरतील.”
उपप्राचार्य प्रा.भारत आलदर यांनी द्रोणाचार्याचे उदाहरण देत गुरुंचे महत्व स्पष्ट केले. सकाळी ७.३० ते १० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे कार्य पार पाडले. त्यानंतर शिक्षकांचा सत्कार व कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थिनी प्राचार्या कु. सृष्टी कांबळे हिने केले. उपप्राचार्य दीक्षा कोलप हिने मनोगत व्यक्त केले तर आभारप्रदर्शन अनामिका चौगुले हिने केले. एकूण २२ विद्यार्थ्यांनी शिक्षक होण्याचा मान मिळवला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक प्रा.डॉ. महावीर बुरसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. सुनील चौगुले व प्रा. बी.ए. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन कु. सानिया बागवान व कु. दुर्गेश्वरी सोनुले यांनी केले.
शिक्षक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला ज्युनिअर विभागाचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा