Breaking

बुधवार, २२ ऑक्टोबर, २०२५

*धक्कादायक! जयसिंगपूरात तरुणाचा निर्घृण खून — अज्ञात मारेकरी फरार*


मयत सुनील किसन पाथरवट

*प्रा.डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक*


जयसिंगपूर  : शहरातील गल्ली क्रमांक १३ मध्ये आज पहाटे एका ३१ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने जयसिंगपूर शहर हादरले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

     अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मृत तरुणाचे नाव सुनील किसन पाथरवट (वय ३१, रा. जयसिंगपूर) असे असून, त्याच्यावर अज्ञात मारेकऱ्याने धारदार शस्त्राने अनेक वार करत जागीच ठार मारले. पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

       घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून, शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. खुनामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला आहे.

  पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते. पोलिसांकडून आरोपीचा लवकरच मागोवा लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

    या निर्घृण हत्येमुळे जयसिंगपूर शहरात तणावाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा