![]() |
| सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार रमेश मिठारे |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
नृसिंहवाडी : सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण घालत रमेश मिठारे यांनी मयत हॉटेल कामगाराच्या कुटुंबाला आर्थिक दिलासा मिळवून दिला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हॉटेल मंगलम मधील दिवंगत कर्मचारी चव्हाण यांच्या वारसदारांच्या खात्यात तब्बल रु. ६,९५,७५०/- इतकी रक्कम जमा झाली असून, दरमहा रु. ४,२०१/- इतकी पेन्शनही मिळणार आहे.
हॉटेल मंगलमचे कर्मचारी चव्हाण यांचे जून २०२४ मध्ये निधन झाले होते. हॉटेलचे मालक अशोक पुजारी गुरुजी यांनी आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेअंतर्गत आपल्या कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी (PF) सुरू केला होता. त्याचाच लाभ चव्हाण यांच्या कुटुंबाला मिळवून देण्यासाठी रमेश मिठारे यांनी स्वतः पुढाकार घेतला.
वारंवार प्रयत्न करून त्यांनी मृत कामगाराच्या नातेवाईकांचा संपर्क साधला, आवश्यक कागदपत्रे गोळा करून कोल्हापूर येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयात सादर केली. केवळ आठ दिवसांतच क्लेम मंजूर होऊन विमा, पेन्शन आणि निधी मिळून सहा लाखांहून अधिक रक्कम वारसदारांच्या खात्यात जमा झाली.
या कामात भविष्य निर्वाह निधी अधिकारी बनजवाडे, धर्माधीकारी, हॉटेल मंगलमचे मालक हर्षद पुजारी, मॅनेजर स्नेहन नंदगावे, शशिकांत कोडणिकर, संजय पाटील (कल्पद्रुम पतसंस्था, हसुर) आणि शहानुर शेख यांनी सहकार्य केले.
रमेश मिठारे यांच्या प्रयत्नांमुळे चव्हाण कुटुंबाला आर्थिक आधार मिळाल्याने सर्व स्तरातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा