| आश्विनी भिडे यांचा सत्कार करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
मुंबई : महापालिकेच्या आयुक्तपदी वरिष्ठ अधिकारी आश्विनी भिडे यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे. भिडे या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या आहेत. भिडे यांनी मंगळवारी दुपारी मावळते आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून पदभार स्वीकारला. आश्विनी भिडे या सध्या मुख्यमंत्री कार्यालयात अपर मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. पुढील आदेश येईपर्यंत त्या मुंबई मेट्रो रेल महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचाही अतिरिक्त कार्यभार सांभाळतील. दरम्यान, भिडे यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या मुख्यमंत्री कार्यालयातील अपर मुख्य सचिव पदावर लोकेश चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रा हे सध्या महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते.
नव्या जबाबदारीत त्यांनी प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यावर भर देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे संबंधित विभागाच्या कामकाजाला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अश्विनी भिडे या पूर्वाश्रमीच्या अश्विनी कुलकर्णी असून त्या लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी आहेत. जयसिंगपूरातील पहिली आयएएस ऑफिसर आहेत. त्यांच्या या निवडीने जयसिंगपूर वासियांना खूप आनंद झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा