Breaking

सोमवार, ३० मार्च, २०२६

*डॉ. एस. एस. भिर्डी रंगमंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा खासदार छ. शाहू महाराज यांच्या हस्ते संपन्न*

   

डॉ. एस. एस. भिर्डी रंग मंदिराचे उद्घाटन करताना खासदार छ.शाहू महाराज, माजी खासदार राजू शेट्टी, संस्थेचे सचिव मिलिंदभाई शहा, विलासभाई शहा, आमदार अशोक माने, कृषीपंडित गणपतदादा पाटील, नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर व अन्य मान्यवर 

*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटी संचलित जयसिंगपूर कॉलेज कॅम्पसमध्ये उभारण्यात आलेल्या डॉ. एस. एस. भिर्डी रंगमंदिर व संकुलातील नव्या वास्तूंचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी ‘डॉ. भिर्डी स्मरणांजली’ या स्मृतिविशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले.

      कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार छ. शाहू महाराज यांच्या हस्ते डॉ. एस. एस. भिर्डी रंगमंदिर व कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमास माजी खासदार राजू शेट्टी प्रमुख उपस्थित होते. उद्घाटनानंतर शाहू महाराज यांनी संस्थेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याचे कौतुक करत डॉ. भिर्डी यांच्या योगदानाचा गौरव केला. अध्यक्षस्थानावरून बोलताना राजू शेट्टी यांनी रंगमंदिर निर्मितीबद्दल समाधान व्यक्त केले.

      कार्यक्रमात विविध नव्या सुविधांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अनेकांत डायनिंग हॉल व कॉम्प्युटर लॅबचे उद्घाटन आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले. अनेकांत लॉन्सचे उद्घाटन कृषीभूषण गणपतराव पाटील यांच्या हस्ते झाले. अनेकांत अतिथीगृहाचे उद्घाटन विलासभाई शहा यांनी केले.अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूलचे उद्घाटन मिलिंदभाई  शहा यांच्या हस्ते झाले. सायन्स लॅबोरेटरीचे उद्घाटन आमदार अशोकराव माने यांनी केले. अनेकांत म्युझिक अकॅडमीचे उद्घाटन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी केले, तर आर्टरूमचे उद्घाटन माजी आमदार उल्हास पाटील यांच्या हस्ते झाले. ऑटोमोबाईल कारचे उद्घाटन सावकार मादनाईक यांनी केले. यावेळी उपस्थित उद्घाटक व मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली.

    जिल्हा बँकेचे संचालक प्रा. आबिटकर, शिरोळचे अमरसिंह माने पाटील, नगरसेवक सचिन शिंदे, कोल्हापूरचे शेतकरी नेते भगवानराव काटे, सुभाष शेट्टी,उद्योगपती अशोक कोळेकर, शेखर पाटील, नगरसेवक  संजय पाटील, मछले मॅडम, पराग पाटील, कोळेकर वहिनी, बजरंग खामकर उपस्थित होते. डॉ. भिर्डी यांचे कुटुंबीय, बारामतीहून संस्थेचे चंद्रवदन शहा मुंबईकर, विद्युत शहा, धवल शहा वाघोलीकर, ॲड.प्रीतम व्होरा,अभिनंदन शहा, विद्याधर महामुनी विशेष करून माजी प्राचार्य डॉ. एच.एम.भालेराव उपस्थित होते.

         या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार पद्माकर पाटील, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, संचालक, प्राध्यापकवर्ग, कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा