![]() |
| CA कु.तन्वी स्वाती विद्यासागर बस्तवाडे |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेतर्फे (ICAI) मे २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या सी.ए. अंतिम परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून जयसिंगपूर येथील कु. तन्वी स्वाती विद्यासागर बस्तवाडे हिने ही प्रतिष्ठेची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी सी.ए. होण्याचा मान मिळवून तिने जयसिंगपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
तन्वीचे दहावीपर्यंतचे शिक्षण हौसाबाई जयपाल मगदूम स्कूल, निमशिरगाव येथे झाले. त्यानंतर तिने उच्च माध्यमिक शिक्षण डी.के.टी.ई. ज्युनिअर कॉलेज, इचलकरंजी येथे पूर्ण केले. पुढे चॉईस कॉलेज, पुणे येथे उच्च शिक्षण घेत असताना तिने सी.ए. अभ्यासक्रमाची यशस्वी वाटचाल सुरू ठेवली. तिचे आर्टिकलशिप प्रशिक्षण शहा खंडेलवाल जैन अँड असोसिएट्स, पुणे येथे पूर्ण झाले.
तन्वीचे वडील विद्यासागर बस्तवाडे हे जिल्ह्यातील नामांकित चार्टर्ड अकाउंटंट असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत सात विद्यार्थ्यांनी सी.ए. पदवी संपादन केली आहे. तिची आई प्रा. स्वाती बस्तवाडे या जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथे अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. तिचा लहान भाऊ तन्मय हा सुद्धा सी.ए. बनण्यासाठी प्रयत्नशील आहे. सी.ए. होण्याचे आई-वडिलांचे स्वप्न अर्थात तन्वीने आपल्या प्रामाणिक अभ्यास, सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द, चिकाटी आणि त्यागवृत्तीच्या जोरावर पूर्ण केले आहे. तिच्या यशामागे पालकांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि शालेय जीवनापासून केलेली नियोजनबद्ध तयारी महत्त्वाची ठरली.
तन्वीच्या या यशाबद्दल राजकीय,शैक्षणिक, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा