Breaking

रविवार, २१ जून, २०२६

*जयसिंगपूर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन योगाभ्यासाद्वारे उत्साहात साजरा*

 

 योग दिनानिमित्त प्रात्यक्षिक सादर करताना 


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर  : येथील जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाभ्यास कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. 

    प्रारंभी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व विशद केले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते तसेच व्यक्तिमत्त्व विकासासाठी योग अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.

         यावेळी शारीरिक शिक्षण विभागाच्या प्रा. अमृता पाटील यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करून त्यांचे महत्त्व व योग्य पद्धतीने योगाभ्यास कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. सहभागी विद्यार्थी व प्राध्यापकांनी योगासने आणि प्राणायामाचा सराव करून योग दिन साजरा केला. या प्रसंगी प्रा. डॉ. नितीश सावंत यांनी आभार व्यक्त केले. 

         या कार्यक्रमाचे नियोजन एन.सी.सी. अधिकारी लेफ्टनंट प्रा. सुशांत पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रभाकर माने, व डॉ. खंडेराव खळदकर यांनी केले. कार्यक्रमास मानव्य विद्याशाखाप्रमुख प्रा. डॉ.विजयमाला चौगुले, उपप्राचार्य प्रा. भारत आलदर, पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे ,कार्यालयीन अधीक्षक संजय चावरे, सर्वं प्राध्यापकवृंद, शिक्षक, प्रशासकीय सेवक व कर्मचारी, एन.सी.सी.छात्र, एन.एस.एसचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा