Breaking

गुरुवार, ९ जुलै, २०२६

*सीए घडविणाऱ्या आक्का सोशल केअर फाउंडेशनची दुसरी वार्षिक सभा उत्साहात*

 

 आक्का सोशल केअर फाउंडेशन, जयसिंगपूर 


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : कै. श्रीमती बाळीशा खुरपे (आक्का) यांच्या प्रेरणेतून तसेच संस्थापक अध्यक्षा सौ. स्वाती विद्यासागर बस्तवाडे यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या आक्का सोशल केअर फाउंडेशनची दुसरी वार्षिक सभा दि. ७ जुलै २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. "समाजासाठी करू काही" हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या या फाउंडेशनने अल्पावधीतच जयसिंगपूर व शिरोळ तालुक्यात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य उभे केले आहे.

        दि. १७ सप्टेंबर २०२४ रोजी स्थापन झालेल्या फाउंडेशनने गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून चार्टर्ड अकाउंटन्सी क्षेत्रात घवघवीत यश मिळवून दिले आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत आठ विद्यार्थ्यांनी द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI), नवी दिल्ली आयोजित सीए परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे.

        दुसऱ्या वार्षिक सभेत नुकतेच सीए परीक्षेत यश मिळविलेल्या सीए तन्वी बस्तवाडे व सीए राजकुमार मसवडे यांचा पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व अभिनंदनपत्र देऊन गौरव करण्यात आला.



       यावेळी फाउंडेशनचे मार्गदर्शक सीए विद्यासागर बस्तवाडे यांनी संस्थेची उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि आगामी शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती देत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सक्षम करण्याचा फाउंडेशनचा निर्धार व्यक्त केला.

        संस्थापक अध्यक्षा प्रा.स्वाती विद्यासागर बस्तवाडे यांनी प्रास्ताविकातून फाउंडेशनच्या स्थापनेमागील भूमिका, गेल्या दोन वर्षांतील कार्याचा आढावा आणि भविष्यातील उपक्रमांची दिशा स्पष्ट केली. नोटीस व विषयवाचन राहुल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पूजा शीतल चौगुले यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. स्नेहल शीतल चौगुले यांनी केले.

       सभेमध्ये उपस्थित पदाधिकारी, सदस्य व सभासदांनी आपापली मते व्यक्त करत फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. तसेच विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या पदाधिकारी व सदस्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

       सर्व सदस्यांनी आक्का सोशल केअर फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, समाजसेवा, विद्यार्थी मार्गदर्शन व सामाजिक बांधिलकी जपत अधिक व्यापक स्वरूपात कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. फाउंडेशनचे शैक्षणिक व सामाजिक उद्दिष्टे अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने कार्य करण्याची ग्वाही दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा