![]() |
| राष्ट्रीय सेवा योजना, जयसिंगपूर कॉलेज(वृक्षारोपण) |
*प्रा. डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक*
जयसिंगपूर : शासनाच्या वनमहोत्सव उपक्रमांतर्गत येथील जयसिंगपूर कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने महाविद्यालय परिसरात विविध जातींच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. या वन महोत्सव उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील बटरफ्लाय गार्डन, ४०० मीटर धावपट्टी परिसर तसेच विद्यार्थी वसतिगृह परिसरात पाणफुटी, चाफा, कृष्णकमळ, घाणेरी, सोनटक्का, नारळ व करंज या विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांच्या सहभागातून करण्यात आली.
या प्रसंगी उपप्राचार्य प्रा. डॉ. विजयमाला चौगुले, प्राणीशास्त्र विभागाचे डॉ. सचिन पाटील, डॉ. सुरज उमडाळे, प्रा. मेहबूब मुजावर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रभाकर माने, डॉ. खंडेराव खळदकर, शाहिद सय्यद, तसेच एनएसएसचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा