![]() |
| अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने खगोल शास्त्रज्ञ डॉ. नारळीकर यांच्या जयंतीनिमित्त संवाद सत्र |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कोल्हापूर शहर व करवीर शाखांच्या वतीने खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या जयंतीनिमित्त ‘डॉ. जयंत नारळीकर यांचा शास्त्रज्ञ होण्याचा प्रवास’ या विषयावर विशेष संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या संवाद सत्रात अंनिसचे कार्यकर्ते सलीम कागवाडे डॉ. नारळीकर यांच्या बालपणापासून ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ होईपर्यंतच्या प्रेरणादायी प्रवासावर संवाद साधणार आहेत. त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनकार्य तसेच विज्ञानप्रसारातील योगदान यावरही यावेळी प्रकाश टाकण्यात येणार आहे.
हे संवाद सत्र शनिवार, दि. १८ रोजी सायंकाळी सहा वाजता चित्रदुर्ग मठ, दसरा चौक, कोल्हापूर येथे होणार आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि विज्ञानप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अंनिसच्या कोल्हापूर शहर व करवीर शाखांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा