Breaking

बुधवार, २२ जुलै, २०२६

*नियोजनबद्ध अभ्यासातून नेट-सेट परीक्षेत यश शक्य : प्रा. डॉ. सूरज चौगुले*

 

 कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. सुरज चौगुले, अध्यक्षस्थानी डॉ. खंडेराव खळदकर, प्रा. मेहबूब मुजावर व प्रा.डॉ. प्रभाकर माने 


*प्रा. विश्रांती माने : विशेष प्रतिनिधी*


*जयसिंगपूर कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विभागाच्या वतीने नेट-सेट कार्यशाळा संपन्न*

जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने नेट-सेट परीक्षेच्या तयारीसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत साधन व्यक्ती म्हणून प्रा. डॉ. सूरज चौगुले व प्रा. मेहबूब मुजावर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.अध्यक्षस्थानी राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. के. डी. खळदकर होते.

      डॉ. सूरज चौगुले यांनी प्रथम सत्रात नेट-सेट पेपर १ संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करताना विविध घटकांना द्यावयाचे महत्त्व, अभ्यासाचे नियोजन, घटकनिहाय वेटेज तसेच परीक्षेतील गुणांचे महत्त्व याविषयी माहिती दिली. पेपर १ ची तयारी प्रभावीपणे कशी करावी, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

        दुसऱ्या सत्रात प्रा. मेहबूब मुजावर यांनी पेपर २ (अर्थशास्त्र) विषयाच्या तयारीसंदर्भात युनिटनिहाय अभ्यासाचे नियोजन कसे असावे, कोणत्या घटकांवर अधिक भर द्यावा तसेच परीक्षेतील गुणांचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

      प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली. या कार्यक्रमास अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रो. डॉ. प्रभाकर माने, डॉ. वंदना देवकर, प्रा.विश्रांती माने, प्रा.कु.स्नेहल रोटे, प्रा.कु.भक्ती सूर्यवंशी व एम.ए. भाग १ व २ चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     स्वागत व प्रास्ताविक कु.सुस्मिता चव्हाण, कु.प्रतीक्षा माने यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.गीतांजली गावडे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा