![]() |
| नशामुक्त युथ फॉर विकसित भारत - शपथ ग्रहण |
*प्रा. बाळगोंडा पाटील : उपसंपादक*
जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागाच्या वतीने 'नशामुक्त युवा फॉर विकसित भारत' 2.0 अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना सामूहिक नशामुक्तीची शपथ देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करून विकसित भारताच्या निर्मितीसाठी युवकांची भूमिका महत्वाची आहे.
कार्यक्रमात मानव्य विद्याशाखा प्रमुख प्रा. डॉ. व्ही. व्ही. चौगुले यांनी मार्गदर्शन करताना, युवकांनी दारू, गांजा, मावा, तंबाखू, अमली पदार्थ यांसारख्या घातक व्यसनांपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. आजच्या काळात मोबाईलचे वाढते व्यसनही चिंतेचा विषय बनला असून, विकसित आणि सशक्त भारत घडविण्यासाठी जनरेशन-झेडने स्वतः व्यसनमुक्त राहून इतरांनाही व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रबोधनात्मक कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रभाकर माने, डॉ. के. डी. खळदकर,अधीक्षक संजय चावरे, प्रा. गणेश कुरले , प्रा.आरती क्षीरसागर, भरत हातगिणे, शाहिद सय्यद तसेच एन.एस.एस.चे स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा