Breaking

रविवार, २ ऑगस्ट, २०२६

*विकसित भारतासाठी तरुणांनी कौशल्यसंपन्न बनावे – प्रा. डॉ . बी. के. माने*

 

 मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते प्रा. डॉ.बी. के. माने, प्राचार्य डॉ.एस. एस. शेजाळ व अन्य मान्यवर 

*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


 सांगली : येथील गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या 'अर्थशास्त्र नियोजन व चर्चा मंडळा'च्या वतीने “विकसित भारत २०४७ : तरुणाईसमोरील संधी व आव्हाने” या विषयावर प्रा. डॉ. बी. के. माने यांचे व्याख्यान संपन्न झाले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. शेजाळ उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. एस. के. रावळ यांनी करून दिला.

        प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. बी. के. माने यांनी आपल्या व्याख्यानात भारताच्या आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिक विकासाचा आढावा घेतला. भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षण, कौशल्य विकास, नवोपक्रम, उद्योजकता आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल अर्थव्यवस्था, स्टार्टअप संस्कृती, हरित ऊर्जा, संशोधन व नवसंकल्पना यांसारख्या क्षेत्रांमध्ये तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

         यावेळी त्यांनी वाढती जागतिक स्पर्धा, कौशल्यांचा अभाव, बेरोजगारी, पर्यावरणीय समस्या आणि सामाजिक आव्हाने यांचाही उल्लेख केला. या आव्हानांवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्याने ज्ञानार्जन करणे, नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्राच्या विकासात प्रत्येक तरुणाचा सहभाग महत्त्वाचा असून आत्मविश्वास, शिस्त आणि परिश्रम यांच्या बळावर भारत विकसित राष्ट्र बनू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विकसित भारताच्या उभारणीत तरुणाईची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन केले.

            अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एस. एस. शेजाळ यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले. विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेसोबतच सामाजिक बांधिलकी जोपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

  कार्यक्रमास डॉ. आर. एस. शहा, डॉ. एच. ए. चौगुले, डॉ. एस.  एस. बुरे, डॉ. जी. के हराळे इत्यादी प्राध्यापक वर्ग  व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. डॉ. एस. एस. बुरे यांनी उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा