![]() |
| मुख्याध्यापक सयाजीराव पाटील, पर्यवेक्षक सतिश चिपरीकर, घोडके मॅडम , सतीश भोसले व गुणवंत विद्यार्थी |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
सातवीच्या राज्य गुणवत्ता यादीत कु.संबोधी मेश्राम १४ वी,तर चौथीच्या यादीत कु.स्वराली पाटील ११ वी
जयसिंगपूर : येथील लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादित केले.राज्य गुणवत्ता यादीत दोन विद्यार्थ्यांनी, तर जिल्हास्तरीय यादीत आठ विद्यार्थ्यांनी स्थान निश्चित केले.
इयत्ता सातवीत कु.संबोधी प्रमोद मेश्राम हिने २७६ गुणांसह राज्यात १४ वा क्रमांक मिळविला. सिद्धी माने, वसुंधरा पाटील व प्रशिका सावंत यांनीही जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.
इयत्ता चौथीत कु.स्वराली आदिनाथ पाटील हिने २७४ गुणांसह राज्यात ११ वा क्रमांक पटकावला. यश माने, मृण्मयी जोशी, चिन्मयी जोशी आणि मनस्वी पाटगावकर यांनी जिल्हास्तरीय यादीत स्थान मिळविले.
या यशाबद्दल स्कूल कमिटी अध्यक्ष राजेंद्र मालू, सदस्य चंद्रकांत(बापू) जाधव, मुख्याध्यापक सयाजीराव पाटील, पर्यवेक्षक एस. एल. चिपरीकर, घोडके मॅडम , सतिश भोसले तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण प्रामाणिक मेहनत, शिक्षकांचे परिपूर्ण मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश मिळाल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा