![]() |
| उद्घाटन करताना संस्थेचे सचिव डॉ.महावीर अक्कोळे, सदस्य शैलेश चौगुले, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, ग्रंथपाल डॉ. धनवंती बामणे व प्राचार्य बाळकृष्ण पाटील |
वाचन संस्कृती वाढीसाठी स्तुत्य उपक्रम; विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : येथील अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारतातील नामांकित प्रकाशन संस्था ‘स्कोलॅस्टिक’ (Scholastic) यांच्या वतीने आयोजित भव्य पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे सचिव महावीर अक्कोळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या पुस्तक प्रदर्शनात सुमारे १ हजार विविध प्रकारची पुस्तके प्रदर्शन व विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस हे प्रदर्शन विद्यार्थ्यांसह पालकांसाठी खुले राहणार आहे. ललितकथा, ललितसाहित्य, वास्तववादी साहित्य, माहितीपर व विज्ञानविषयक पुस्तके, प्रारंभिक शिक्षणासाठी कृती पुस्तके, चित्रकथा, कादंबऱ्या, गोष्टी, कॉमिक्स आदी विविध विषयांवरील पुस्तकांचा प्रदर्शनात समावेश आहे.
उद्घाटनप्रसंगी सदस्य शैलेश चौगुले, जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे आणि ग्रंथपाल डॉ. धनवंती बामणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या पुस्तक प्रदर्शनाचे संयोजन शाळेचे मॅनेजर अभिजीत अडदंडे, मुख्याध्यापक बाळकृष्ण पाटील, शाळा समन्वयक कल्याणी अक्कोळे, शालेय शिस्तप्रमुख शिल्पा अडदंडे, ग्रंथपाल पूजा रजपूत आणि कलाशिक्षिका साक्षी चौगुले यांनी केले.
आजच्या मोबाईल आणि डिजिटल युगात मुलांमध्ये स्क्रीनकडे आकर्षण वाढत असताना वाचनाची सवय कमी होत असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा वाचनाची गोडी निर्माण व्हावी, पुस्तकांचे महत्त्व समजावे आणि वाचन संस्कृतीला चालना मिळावी, या हेतूने शाळेने हा उपक्रम राबविला आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वृंदीगत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा