Breaking

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२६

*जयसिंगपूरच्या कवडसा फाउंडेशनची रुग्णसेवा साहित्य सेवेत ‘

 

रुग्णसेवा साहित्य रुग्णांना प्रदान करताना संस्थापक डॉ. महावीर अक्कोळे, अध्यक्ष शुक्राचार्य उरुणकर, सचिव प्रा. डॉ. प्रभाकर माने, डॉ. मजलेकर व सलीमभाई 


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*

  

फॉर्च्यून शहा रुग्णसेवा साहित्य केंद्राचा गरजू रुग्णांना मोठा आधार; रक्तसेवेतही उल्लेखनीय योगदान


जयसिंगपूर : गेल्या पंधरा वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अविरतपणे समाजसेवा करणाऱ्या कवडसा फाउंडेशनने रुग्णसेवेच्या क्षेत्रातही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कवडसा फाउंडेशनतर्फे संचालित ‘फॉर्च्यून शहा रुग्णसेवा साहित्य केंद्रा’ने २००० रुग्णांना रुग्णसेवा साहित्य उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा नुकताच पूर्ण केला. राजू जमादार यांच्या नातेवाईकांना या केंद्राचे २००१वे लाभार्थी होण्याचा मान मिळाला, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष शुक्राचार्य ऊर्फ बंडू उरुणकर यांनी दिली.

    एप्रिल २०१३ मध्ये सुरू झालेल्या या रुग्णसेवा साहित्य केंद्राच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना अत्यल्प मासिक भाड्याने विविध वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून दिली जातात. अपघातामुळे हात-पायांना दुखापत होऊन अनेक महिने अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांपासून कॅन्सरच्या अंतिम अवस्थेतील रुग्णांपर्यंत तसेच तात्पुरत्या स्वरूपात रुग्णसेवा साहित्याची आवश्यकता असलेल्या रुग्णांना या उपक्रमाचा मोठा आधार मिळत आहे.

      फाऊलर बेड, व्हीलचेअर, सक्शन मशीन, ऑक्सिजन सिलिंडर यांसह हॉस्पिटलमध्ये आवश्यक असणारी विविध उपकरणे योग्य डिपॉझिट घेऊन अत्यल्प भाड्याने उपलब्ध करून दिली जातात. रुग्ण बरा झाल्यानंतर किंवा दुर्दैवाने रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर ही महागडी उपकरणे घरात निरुपयोगी ठरतात. त्यामुळे ती विकत घेण्याचा आर्थिक भार टाळून गरजू कुटुंबांना कवडसा फाउंडेशनच्या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळत आहे.

       जयसिंगपूरचे उद्योगपती कनकभाई शहा यांचा कवडसा फाउंडेशनला भक्कम पाठिंबा व आर्थिक सहकार्य लाभत असल्याचे संस्थेचे संस्थापक व मार्गदर्शक डॉ. महावीर अक्कोळे यांनी सांगितले. वाढते अपघात, कॅन्सरच्या रुग्णांची संख्या आणि उपचारांचा वाढता खर्च लक्षात घेता भविष्यात आणखी आधुनिक रुग्णसेवा उपकरणे उपलब्ध करून देऊन केंद्राचा विस्तार करण्याचा पदाधिकाऱ्यांचा मानस आहे.

   रक्तसेवेच्या क्षेत्रातही कवडसा फाउंडेशनचे कार्य उल्लेखनीय असून, आतापर्यंत सुमारे १९८० रुग्णांना मोफत रक्तपिशव्या उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. अक्कोळे यांनी दिली.

       यावेळी संस्थेचे सचिव प्रा. डॉ. प्रभाकर माने, खजिनदार अमर माने, प्रा. बाळगोंडा पाटील, डॉ. मजलेकर व सलीम नदाफ उपस्थित होते.


रुग्णसेवा साहित्याकरिता संपर्क :

डॉ. महावीर अक्कोळे सेवायोग, शाहूनगर, जयसिंगपूर ४१६१०१, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर.

 मोबाईल नं. : 9175924492

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा