Breaking

रविवार, २७ सप्टेंबर, २०२६

*नांदणीत तरुणाच्या पोटावर चाकूने वार; संशयित ताब्यात*


 नांदणीत तरुणाचा खून झालेले ठिकाण व पडलेलं रक्त 

*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


 जयसिंगपूर :  नांदणी (ता. शिरोळ) येथील सहारा चौकात रविवारी (ता. २७) सायंकाळी चारच्या सुमारास झालेल्या वादातून एका ४० वर्षीय तरुणाच्या पोटावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. मुपेद शेख असे जखमी तरुणाचे नाव असून, या प्रकरणी संदीप माळी याला शिरोळ पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

     पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुपेद शेख व संदीप माळी हे दोघे मित्र असल्याचे समजते. रविवारी सायंकाळी सहारा चौकात दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. यावेळी संदीप माळी याने मुपेद शेख यांच्या पोटावर चाकूने वार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

     या हल्ल्यात शेख गंभीर जखमी झाले. घटनेनंतर घटनास्थळी काही प्रमाणात रक्त सांडल्याचे दिसून आले. जखमी शेख यांना उपचारासाठी तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

        घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांच्यासह जयसिंगपूर व शिरोळ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.

    दरम्यान, संशयित संदीप माळी याला शिरोळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून, हल्ल्याचे नेमके कारण तसेच घटनेमागील परिस्थितीचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणी शिरोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा